प्रश्न:1 दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस (National Handloom Day) केव्हा साजरा करण्यात येत असतो? A) 1 ऑगस्ट B) 6 ऑगस्ट C) 7 ऑगस्ट D) 8 ऑगस्ट उत्तर C) 7 ऑगस्ट प्रश्न:2 61 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला असून, त्यामध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? A) जगू आणि जुलियंट B) आशा C) बेहरा D) शिवबा उत्तर: C) बेहरा प्रश्न 3 देशात अवयवदान (Organ Donation) करण्याचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? A) महाराष्ट्र B) आंध्र प्रदेश C) तेलंगणा D) कर्नाटक उत्तर: C) तेलंगणा प्रश्न:4'छावा राईड ॲप्लिकेशन' (Chhava Ride Application) कोणत्या राज्याच्या अंतर्गत लवकरच सुरू होणार आहे? A) गुजरात B) महाराष्ट्र C) उत्तर प्रदेश D) मध्य प्रदेश उत्तर:B) महाराष्ट्र प्रश्न:5 जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? A) 75 व्या B) 79 व्या C) 82 व्या D) 85 व्या उत्तर:B) 79 व्या प्रश्न:6 उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या (51 फूट उंच) रामजींच्या पुतळ्याचे अनावरण कोठे झाले आ...
चालू घडामोडी प्रश्न दिनांक 5 ऑगस्ट
प्रश्न १: डॉ. एम एस स्वामीनाथन यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याने कोणता दिवस शाश्वत कृषी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
अ) 1 ऑगस्ट
ब) 5 ऑगस्ट
क) 7 ऑगस्ट
ड) 10 ऑगस्ट
उत्तर: क) 7 ऑगस्ट
प्रश्न २: कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट (प्रेसिडेंट रूल) आणखी सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आलेला आहे?
अ) गोवा
ब) तमिळनाडू
क) आसाम
ड) मणिपूर
उत्तर: ड) मणिपूर
अधिक माहिती:
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा मुदतवाढ कालावधी 13 ऑगस्ट 2025 पासून 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे. 30 जुलै 2025 रोजी लोकसभेने वैधानिक ठरावाद्वारे या मुदतवाढीला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने चालू असलेल्या वांछिक संघर्ष आणि नाजूक कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ही केंद्रीय प्रशासन चालू ठेवण्याचे कारण म्हणून नमूद केले आहे. राष्ट्रपती राजवट म्हणजे एखाद्या राज्यामध्ये संवैधानिक यंत्रणा कोलमडल्यावर लादलेली केंद्र सरकारची राजवट होय. ही भारतीय संविधानाच्या कलम 356 द्वारे अधिकृत आहे आणि सुरुवातीला सहा महिन्यांसाठी लागू केली जाते, त्यानंतर दर सहा महिन्यांनी वाढवता येते, जी जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत वाढवता येते.
प्रश्न ३: कोणत्या राज्याने प्रत्येक घरामध्ये हाय स्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी 'हर घर फायबर' नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे?
अ) महाराष्ट्र
ब) कर्नाटक
क) गोवा
ड) केरळ
उत्तर: क) गोवा
उद्देश:
या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील प्रत्येक घरामध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करणे हा आहे.
प्रश्न ४: यू नेव यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
अ) थायलंड
ब) व्हिएतनाम
क) म्यानमार
ड) लाओस
उत्तर: क) म्यानमार
प्रश्न ५: कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धा 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
अ) इक्वाडोर
ब) ब्राझील
क) अर्जेंटिना
ड) कोलंबिया
उत्तर: ब) ब्राझील
स्पर्धेचे ठिकाण:
ही स्पर्धा इक्वाडोर येथे आयोजित करण्यात आली होती.
प्रश्न ६ वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लिजेंड्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
अ) ऑस्ट्रेलिया
ब) भारत
क) इंग्लंड
ड) दक्षिण आफ्रिका
उत्तर: ड) दक्षिण आफ्रिका
प्रश्न ७: उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे?
अ) भारतरत्न
ब) पद्मभूषण
क) यश भारती पुरस्कार
ड) शौर्य चक्र
उत्तर: क) यश भारती पुरस्कार
पुरस्काराचे क्षेत्र:
शिक्षण, साहित्य, पत्रकारिता आणि संस्कृती यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान केले जातात.
प्रश्न ८: कोणत्या देशातील पहिले स्वदेशी ऑर्बिटल रॉकेट 'एरीस' चाचणी उड्डाणादरम्यान अवघ्या 14 सेकंदात कोसळले?
अ) भारत
ब) जपान
क) ऑस्ट्रेलिया
ड) अमेरिका
उत्तर: क) ऑस्ट्रेलिया
अधिक माहिती:
हे रॉकेट क्वीन्सलँडमधील ओबेन जवळील अंतराळ केंद्रावरून पहिल्या चाचणी उड्डाणादरम्यान कोसळले. 'गिलमोर स्पेस टेक्नॉलॉजीज'ने हे रॉकेट लहान उपग्रहांना कक्षेत वाहून नेण्यासाठी डिझाईन केले होते.
प्रश्न ९: 'नलम काकूम स्टॅलिन' योजनेअंतर्गत वैद्यकीय शिबिरांचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे?
अ) कर्नाटक
ब) केरळ
क) आंध्र प्रदेश
ड) तमिळनाडू
उत्तर: ड) तमिळनाडू
प्रश्न १०: कोणत्या राज्यातील भूस्खलनग्रस्त गावांना मदत करण्यासाठी 'ऑपरेशन सहयोग' नावाचे ऑपरेशन राबवण्यात आले आहे?
अ) मिझोराम
ब) नागालँड
क) मणिपूर
ड) मेघालय
उत्तर: क) मणिपूर
सहभागी संस्था:
भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल्सने मिळून हे ऑपरेशन सुरू केले आहे.
प्रश्न ११: प्रोफेसर मिशेल डोहर्टी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला खगोलशास्त्रज्ञ बनल्या आहेत?
अ) अमेरिका
ब) फ्रान्स
क) ब्रिटन
ड) जर्मनी
उत्तर: क) ब्रिटन
प्रश्न १२: कोणत्या देशाने त्यांचे सर्वात शक्तिशाली अणुवस्त्र नसलेले 'जी एझेड एपी' (GAZAP) बॉम्ब विकसित केलेला आहे?
अ) इराण
ब) इराक
क) तुर्कीय
ड) पाकिस्तान
उत्तर: क) तुर्कीय
प्रश्न १३: 2025 च्या फिझू (FISU) जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये पदक क्रमवारीमध्ये भारताचा अंतिम क्रमांक काय होता?
अ) पंधरावा
ब) विसावा
क) पंचविसावा
ड) दहावा
उत्तर: ब) विसावा (20वा)
भारताची पदके:
भारताने एकूण 12 पदके जिंकली, ज्यात दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. जपान 34 सुवर्ण पदकांसह या पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानावर होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा